लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश विभाग, रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी  फैमिदा काझी यांची निवड.

              लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार यांचा विकास हा एकच ध्यास घेऊन आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारी महाराष्ट्र राज्यातील एकमेव संघटना अशी ओळख निर्माण केली आहे. लोकशाही पत्रकार संघाच्या सिबिडी बेलापूर मुंबई येथील कार्यालयात राज्य कोरकमिटी च्या बैठकीत एकमताने लोकशाही पत्रकार संघाची महाराष्ट्र राज्य, मराठवाडा, जिल्हा, तालुका कार्यकारणी तील पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या सं. अ. बीबी वैद्य, प्रदेश अध्यक्ष प्रताप साळुंके यांच्या मार्गदर्शन खाली राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव,वसीम शेख प्रदेश उपाध्यक्ष, महेबूब शेख प्रदेश अध्यक्ष टीव्ही, युट्युब चॅनल विकास समिती, संध्या भोसले  प्रदेश उपाध्यक्ष यांनी डॉ. प्रा. सोपान सुरवसे यांची निवड प्रदेश उपाध्यक्ष पदी केली असून ते  मराठी भाषा विभागाचे प्रमुख स्वा. सावरकर महाविद्यालय बीड असून  काशिनाथनगर, पांगरी रोड बीड येथील रहिवाशी आहेत. प्रा. आयेशाखान यासीन मुलानी यांची निवड प्रदेश कार्याध्यक्ष पदी करण्यात आली आहे. त्या सामाजिक कार्यकर्त्यां आणि पत्रकार असून
लक्ष्मीकांत नगर तालुका इंदेवाडी जिल्हा जालना येथील रहिवाशी आहेत.फैमीदा मुश्ताक काझी रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा तसेच दैनिक युवती राज वृत्तपत्राच्या उपसंपादक आहेत. त्या सामाजिक कार्यकर्ते पण असून कोकण नगर, मजगाव रोड ता. जि.रत्नागिरी  येथील रहिवाशी आहेत. संध्या सुधीरराव सरोदे  प्रदेश कार्याध्यक्ष महिला उद्योग विकास समिती पदी निवड केली असून त्या जाजूवाडी, विठ्ठल मंदिर जवळ, परळी जि. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दैनिक युवती राज च्या त्या परळी शहर प्रतिनिधी आहेत. बालाजी शेषराव अडियाल प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली असून लक्ष्मीनारायण पुरा, मस्तगड जिल्हा जालना येथील रहिवाशी आहेत. भिमराव माधवराव हैबते  यांची निवड मराठवाडा समन्वयक
टिव्ही युट्यूब  विकास समिती पदी केली असून ते विनकर कॉलनी, सुळटेकडी, चौफाळा, नांदेड येथील रहिवाशी आहेत.उमाकांत लक्ष्मण अहिरराव  यांनी अनेक टीव्ही चॅनल आणि दैनिकांमध्ये काम केले असून त्यांची साक्री तालुका अध्यक्ष
पदी निवड केली असून ते
मु. पो. देगांव ता. साक्री जि. धुळे येथील रहिवाशी आहेत.यांच्या निवड केल्यानंतर संस्थापक अध्यक्ष म्हणाले की,लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकारांच्याआणि महाराष्ट्र मधील तमाम सर्व सामान्य नागरिकांचे देखील विविध मागण्या शासन दरबारी मांडून मंजूर करून घेणार आहेत.विविध समित्या स्थापन करून महाराष्ट्र राज्यात तालुक्यात सर्वत्र विकास केला जाईल.विविध कार्यक्रम साजरे केले जातील.एक वेगळा ठसा उमटवण्याचा  एल. पी. एस. च्या माध्यमातून  प्रयत्न केला जाईल.
याप्रसंगी नूतन राज्य, विभाग, जिल्हा, तालुका कार्यकारणी तील पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वाटप करून  निवड जाहीर करण्यात आल्या आहेत .यावेळी सं. अ. बीबी वैद्य, राष्ट्रीय अध्यक्ष माणिक वाघमारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मंगला वाघ, राष्ट्रीय निरीक्षक डॉ. भोळे, मुंबई प्रदेश  अध्यक्ष मंत्रालय कामकाज दत्तात्रय हंडीबाग, राष्ट्रीय सचिव छाया वैद्य, राष्ट्रीय अध्यक्ष महिला बचत गट, उद्योग विकास समिती सुनंदा केदार यांच्या मार्गदर्शनानुसार लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष – माणिक वाघमारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष – संदीप जाधव,राष्ट्रीय कार्याध्यक्ष-मंगला वाघ, प्रदेश अध्यक्ष प्रताप साळुंके पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रामदास तपसे, वसीम आजाद, साजेद सय्यद, बालाजी अडियाल,प्रदेश कार्याध्यक्ष -अयुब पठाण ,  प्रदेश कार्याध्यक्ष महिला आघाडी आयेशा खान,टीव्ही -युट्युब चॅनल विकास समितीचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख प्रदेश ,  मराठवाडा सचिव अनिस कुरेशी,प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी-निलोफर शेख, प्रदेश उपाध्यक्ष संध्या भोसले, प्रदेश उपाध्यक्ष महिला बचत गट उद्योग विकास समिती सारिका शेवाळे, प्रदेश अध्यक्ष महिला अन्याय अत्याचार निर्मूलन विकास समिती श्रद्धा कंडूडे, प्रदेश उपाध्यक्ष पोलीस मित्र विकास समिती  राणी झिंझुर्डे पाटील, प्रदेश सचिव राणीताई शेख,बीड जिल्हा अध्यक्ष शेख बिलाल, आत्माराम वाव्हाळ यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version