मौजे बाजारवाडी (जैतापूर) सीआरझेड अनधिकृत बांधकाम प्रकरणात मोजणी; आमदार किरण सामंत यांची दिलासादायक भूमिका.

राजू सागवेकर/राजापूर

               राजापूर तालुक्यातील मौजे बाजारवाडी, जैतापूर येथील सीआरझेड (CRZ) उल्लंघन प्रकरणात १० जानेवारी २०२५ रोजी ३० जणांच्या नावावर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०२५ रोजी पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली. आज, १० फेब्रुवारी रोजी, शासनाच्या पत्रानुसार भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत संबंधित ठिकाणी मोजणी करण्यात आली.  सदर प्रकरणाविषयी ३ फेब्रुवारी रोजी आमदार किरण भैय्या सामंत यांच्याकडे विषय मांडण्यात आला होता. तसेच, मोजणी प्रक्रियेच्या दिवशी संपूर्ण परिस्थिती त्यांना कळवण्यात आली. “काळजी नसावी, काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत आहे,” असे दिलासादायक आश्वासन आमदार किरण भैय्या सामंत यांनी समीर शिरवडकर यांच्या मार्फत नोटीसधारकांना दिले.

              मोजणी प्रक्रियेदरम्यान शिवसैनिक समीर शिरवडकर, प्रसाद मांजरेकर, तसेच या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे श्रीकृष्ण राऊत उपस्थित होते. जैतापूर सरपंच राजप्रसाद राऊत हे देखील या प्रक्रियेत दूरध्वनीद्वारे सहभागी होते. स्थानिक नागरिकांना या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी पुढील स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे श्री. समिर शिरवडकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version