न्यू इरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अजिज शेकासन यांच्या संकल्पनेनुसार बाल लेखक उबेद शेकासन व मॉडेल सैतवडे येथील राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा इरा इंग्लिश स्कुल सैतवडे येथे नुकताच सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उबेद शेकासन त्याची आई व आजोबांचा ही सत्कार करण्यात आला. या समारंभाचे मुख्य अतिथी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रहिमान माद्रे म्हणाले की,उबेद शेकासन मुळे सैतवडे गावाला एक नवीन ओळख निर्माण होईल. उबेद हा सध्या इयत्ता ७ वी वर्गात शिकत असताना त्याने आतापर्यंत ११ पुस्तके लिहिली आहेत. बाल लेखक म्हणून त्यांने रेकॉर्ड केले आहे.त्याची कल्पकता,त्याचे ध्येय हे कौतुकास्पद आहे.यावेळी मुख्याध्यापक विलास कोळेकर, श्रीमती रिया लांजेकर श्रीमती ऋतुजा जाधव,सादिक कापडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सेक्रेटरी सादिक कापडे , सदस्य गनी खतीब , नगमा खान, अजिज माद्रे ,हशमत निवेकर, रफीक खलफे, उपसरपंच मुनाफ वागळे, माजी पोलीस पाटील इब्राहिम मुल्ला,ग्रामपंचायत सदस्य बानु खलपे, इलियास माद्रे,समीर सय्यद,कायदा साथी अरुण मोर्ये आदी मान्यवर पालक उपस्थित होते.यावेळी दि मॉडेल इंग्लिश स्कुल मधील राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा व संघाचा तसेच मार्गदर्शक शिक्षिका ऋतुजा जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक इमरान अंतुले यांनी केले.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन रुमय्या जांभारकर यांनी केले. दखल न्यूज महाराष्ट्र
सैतवडे येथील न्यू इरा इंग्लिश स्कुलमध्ये बाल लेखक उबेद शेकासन व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या मॉडेलच्या विद्यार्थीनींचा सत्कार.
