सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल मध्ये  विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न.

                  28 फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे येथे  शालेय विज्ञान प्रदर्शनाचे  आयोजन  करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन  गुंबद गावच्या सरपंच सौ.उषा राजेश सावंत यांच्या हस्ते फीत कापून तसेच  या प्रदर्शनाचे श्री शफी चिकटे यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले.
या प्रदर्शनास मॉडेलच्या विद्यार्थ्याबरोबरच  जांभारी ,धाकटी जांभारी ,सैतवडे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही भेट दिली.
तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री माद्रे,तसेच श्री हशमत माद्रे,श्री कापडे आदींनी भेट दिली.संस्थाध्यक्ष श्री माद्रे यांनी उतम प्रयोग सादरीकरण केलेल्या काही  विद्यार्थ्यांना रोख रकमेचे बक्षीस देवून कौतुक केले.
सकाळ सत्रात भारतरत्न डॉ.सी.व्ही रामण  यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी  विज्ञान शिक्षिका श्रीमती सुवर्णा देशमुख यांनी विज्ञान दिनाची सविस्तर माहिती दिली.
विविध प्रयोगाचे उत्तम सादरीकरण करुन हे विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले. या प्रदर्शनासाठी देशमुख मँडम यांनी पुढाकार घेतला.यावेळी श्रीमती ऋतुजा जाधव,श्री राजेश पोवार सर,कु.सोनाली निवेंडकर, श्रीमती गमरे मँडम ,श्री राजेंद्र कदम यांनीही याकामी उत्तम संयोजन केले.

Exit mobile version