मी तुला नेहेमी सुखी ठेवेन…’ चिमुकल्यांनी दिलं वचन….

रत्नागिरी – ‘ मोठं झाल्यावर मी तुला कायम सुखी ठेवेन…’ महिला दिनाचं औचित्य साधत संकेता  संदेश सावंत यांच्या अभ्युदय नगर इथल्या तायक्वांदो प्रशिक्षण वर्गातील चिमुकल्यांनी आपल्या पालकांना  वचन दिलं.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अभ्युदय नगर बहुउद्देशीय सभागृह येथील  तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रात  या खेळाचे  प्रशिक्षण घेणाऱ्या या मुलांनी प्रशिक्षक संकेता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिन  साजरा केला. प्रशिक्षण केंद्रातील  प्रत्येक मुलाने आपल्या महिला पालकाचे पाद्यपूजन करून  आशीर्वाद  घेतले आणि मोठं झाल्यावर त्यांना कायम सुखी ठेवण्याचं वचन दिलं. यावेळी सर्व पालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं औक्षण करण्यात आल. यावेळी पालक आणि मुलांना खाऊ देण्यात आला.  मुलांच्या मनात आई, आजी, काकू, मावशी, आत्ते, ताई अशा वेगवेगळ्या नात्याने बांधल्या गेलेल्या  तिच्याबद्दल  सदैव कृतज्ञता राहावी यासाठी बाल मनावर संस्कार करणारे असे छोटे छोटे क्षण अत्यंत महत्वाचे असल्याचं मत यावेळी सर्व पालकांनी व्यक्त केलं.
या कार्यक्रमाला प्राशिक्षिका संकेता संदेश सावंत यांच्यासह सौ. श्रेया शुभम पवार, सौ. आकांक्षा नीरज जैन, सौ. निकिता राहुल कवितके, डॉ. प्रियांका मयूर कांबळे, डॉ. उज्ज्वला पांडुरंग कांबळे आणि सौ. सोनाली संदेश सावंत हे पालक यावेळी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र q

Exit mobile version