रत्नागिरी- रत्नागिरीतील तरुणांनी “शिप मॉडेलिंग ” विषयात आवड दाखवत भारतीय नौसेनेची कोलकाता बोटीची सुमारे पंधरा फूट लांब आकाराची प्रतिकृती तयार केली आहे.
ड्रीम मॉडेल क्राफ्ट या फर्मचे प्रमुख श्री मयूर वाडेकर हे चांदेराई रत्नागिरी येथील रहिवासी असून शिप मॉडेलिंग या क्षेत्रात गेली अनेक वर्ष यशस्वीरित्या काम करत आहेत. त्यांच्या टीमने 15 दिवस रात्र मेहनत करून कोलकाता या लढाऊ बोटीची प्रतिकृती तयार केली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी मयूर वाडेकर यांना निलेश मिस्त्री राहणार वांद्री, गणेश पांचाळ राहणार निवळी, महेंद्र कोलगे राहणार कोतवडे यांनी कारपेंटर म्हणून सहकार्य केले. तर संदेश जाधव व पांडुरंग बाईत यांनी सॅडिंग व फॅब्रिकेशन चे काम पाहिले . फहद लाला, यश डोंगरे, निहारिका राऊत यांनी मरीन फिटिंग व मदतनीस म्हणून काम पाहिले तर रेडियम वर्क साठी दानियल सारंग यांनी सहकार्य केले. तसेच शिर्के प्रशाला, गोगटे जोगळेकर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्स यांनीही शिप बनवायला सहकार्य केले.
कोलकत्ता ही लढाऊ बोट पाहण्यासाठी अनेक जाणकारांनी व बोट प्रेमींनी भाटे येथे जाऊन भेट दिली. शिप मॉडेलिंग या विषयात कोकणाचा मोठा वाटा गेली अनेक वर्षे भारतीय नौदलात राहिला आहे. यापूर्वी देखील भारतीय नौदलात कोकणात तयार करण्यात आलेल्या बोटींचा समावेश होता. हे लक्षात ठेवून कोकणातील तरुणांनी याकडे करिअर म्हणून देखील पाहिले पाहिजे अशी प्रतिक्रिया ड्रीम मॉडेल क्राफ्ट फर्मचे प्रमुख श्री मयूर वाडेकर यांनी दिली आहे. ही बोट पश्चिमी बेडा (Flag Office,Western Naval Command )मुंबई येथे पाठवली जाणार आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र..
