लांजा : भडे गावचे सुविद्य पोलीस पाटील श्री. प्रशांत बोरकर यांची कर्मयोगी समाजसेवी पुरस्कारासाठी राज्यस्तरीय निवड झाली आहे. ग्रामविकास प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्री. प्रशांत बोरकर यांना मागील एका महिन्यात मिळालेला हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. उच्चशिक्षित असलेल्या बोरकर यांनी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले असून, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.गावातील जिल्हा परिषद शाळेचा गुणवत्तापूर्ण दर्जा करण्यासाठी बोरकर हे विशेष उपक्रम हाती घेत आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझा नसून माझे कुटुंब, वरिष्ठ, मित्रपरिवार आणि मार्गदर्शन करणाऱ्या गुरूवर्यांचा आहे. मी त्यांना तो समर्पित करतो.”
त्यांच्या या यशाबद्दल भडेगाव व परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र
भडे गावचे पोलीस पाटील श्री. प्रशांत बोरकर यांना राज्यस्तरीय कर्मयोगी समाजसेवी पुरस्कार जाहीर .
