भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब पुरस्कृत मुरुडवाडा क्रिकेट मंडळ आयोजित अंडरआर्म लिग क्रिकेट स्पर्धेस सुरुवात.

रत्नागिरी : भाजपा कार्यकारी अध्यक्ष सन्मा. आमदार श्री रविंद्रजी चव्हाण पुरस्कृत क्रिकेट मंडळ आयोजित भव्य नाईट अंडरआर्म लिग क्रिकेट स्पर्धा उत्सवाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असून. पाच मे रोजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भाजपाचे श्री अनिकेतजी पटवर्धन यांच्या सहकार्यामुळे, जिल्हाध्यक्ष श्री राजेशजी सावंत आणि माजी शहराध्यक्ष श्री राजनजी फाळके साहेब यांच्या पाठपुराव्याने या स्पर्धा संपन्न होत आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष श्री दादा ढेकणे, श्री नितीन जाधव, श्री संतोषजी बोरकर, सौ पल्लवीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  दि. ०५ मे रोजी एम.सी.सी क्रिकेट मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन समारंभ जल्लोषात संपन्न झाला. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखविली या स्पर्धेसाठी अनेकांनी मेहनत घेतलेली दिसून येते. या स्पर्धा ९ मे २०२५ पर्यंत संपन्न होणार असून. ९ मे रोजी रात्री ११ वाजता बक्षीस समारंभ होणार आहे. क्रिकेट प्रेमींनी या स्पर्धांचा पाहण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version