मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई.  बोर्डाच्या शाळेमध्ये  विविध विषयांतर्गत शालेय प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार ..

प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई.  बोर्डाच्या शाळेमध्ये  विविध विषयांतर्गत शालेय प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.
         या प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून  शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रद्युम्न  माने,शाळेच्या व्यवस्थापिका सौ. ईशानी माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुमन अरोरा यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.प्रद्युम्न माने यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
          या प्रदर्शनामध्ये इंग्रजी, मराठी , हिंदी या भाषा  विषयांतर्गत या  भाषांचे व्याकरण, भाषेतील शाब्दिक खेळ,या भाषांमधील प्रसिद्ध साहित्यिकांची  माहिती देणारे उद्बोधक असे प्रकल्प सादर करण्यात आले.मराठी विषयांतर्गत  महाराष्ट्रीयन  संस्कृती,लोककला यांचेही दर्शन घडविण्यात आले.  समाजशास्त्र या विषयांतर्गत हवामान, नैसर्गिक घटक, संसाधने यावर आधारित प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले .गणित  विषयाअंतर्गत गणितातील महत्वाची सूत्रे ,प्रसिद्ध गणितज्ञ, गणितातील प्रसिद्ध सिद्धांत यावर आधारित प्रकल्प सादर केले गेले. विज्ञान या विषयांतर्गत प्रसिद्ध वैज्ञानिक, त्यांची संशोधने, विज्ञानातील प्रसिद्ध सिद्धांत  – सूत्र या संदर्भात प्रकल्प सादर केले .संगणक या विषयांतर्गत रोबोटिक्स, ए.आय., संगणक या विषयाशी निगडित प्रकल्प सादर केले.  शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत विविध खेळ, त्यांचे नियम, त्यांची मैदाने या संदर्भात सादरीकरण केले. त्याचबरोबर नृत्य, गायन, योगा, नैतिक  मूल्ये या विषयांशी निगडित कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
         या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना, त्यांच्यातील क्रियाशीलतेला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प शाळेकडून राबवण्यात आला याबाबत पालक वर्गाकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले.शाळेच्या सर्व  शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुमन अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडले.

Exit mobile version