प्रभाग क्रमांक ६ मधील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतलेला लाभ.
रत्नागिरी : रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मध्ये दामले विद्यालय समोर जोगळेकर हॉल मारुती मंदिर येथे जय हो प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मधील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप व शालेय साहित्य वाटप असा कार्यक्रम निलेश महादेव आखाडे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी व प्रभागातील नागरिकांनी हजेरी लावली.
जय हो प्रतिष्ठान व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब व आयटी जिल्हाप्रमुख निलेश आखाडे यांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, जय हो प्रतिष्ठानचे प्रमुख राजू भाटलेकर व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये राजेंद्र पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बद्दल आपले विचार व्यक्त केले. निलेश आखाडे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगत, जय हो प्रतिष्ठानने केलेली मदत, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या वह्या व माझ्याकडून दिलेली शैक्षणिक साहित्य व यानंतर ही कायम प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी काम करत राहणार असल्याचे देखील सांगत.. तुम्ही कधीही हाक मारा तुमचा निलेश दादा तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असेल ! असा उपस्थितांना शब्द दिला. त्यानंतर जय हो प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भाटकर यांनी देखील जय हो प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाणारे सामाजिक काम सांगत निलेश आखाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांनी व शेकडो विद्यार्थ्यांनी या मोफत शैक्षणिक व गणवेश वाटपाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमांमध्ये रत्नागिरी शहर अध्यक्ष दादा ढेकणे, राजू भाटलेकर मनोज पाटणकर, सौ.कांचन मुळ्ये, सौ.सायली बेर्डे, सौ.पल्लवीताई पाटील, सौ.भक्ती दळी, श्री.नितीन जाधव, सौ.संगीता कवितके, श्री.नरेंद्र कदम,सौ. प्रज्ञा टाकळे, सौ. निधी आखाडे, श्री.शैलू बेर्डे,अनुराग दांडेकर, सौ.रंजना भोसले आदी.नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.
रत्नागिरी शहर प्रभाग क्र. ६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने शालेय गणवेश, व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न…
