नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याने रत्नागिरी भंडारी समाज बांधवांनी नितेश राणे यांचे केले अभिनंदन.

भंडारी समाजाचा इतिहास मोठा असुन मायनाक भंडारी यांचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे : सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे.

रत्नागिरी : मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत अनेक किल्ले काबिज करण्यात त्यांचा हातभार होता ते पहीले आरमार प्रमुख अपराजित योध्दा होते सिंधुदुर्ग नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याचे कळताच रत्नागिरीतील भंडारी समाजबांधव.. व मायनाक भंडारी यांचे वंशज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील अद्यावत बनवलेल्या नियोजन सभागृहाला अपराजित योध्दा मायनाक भंडारी सभागृह असे नामकरण करण्यात आले आहे. याविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले की हे पूर्वीच व्हायला हवे होते. हे नामकरण केल्यामुळे भंडारी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आणि नितेशजी राणे साहेब यांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक करावे यासाठी अभिनंदनाचे पत्र देताना रत्नागिरी मांडवी मायनाकवाडी येथील संजय शिवलकर मायनाक, कृष्णकांत मायनाक, प्रशांत मायनाक, अमृता मायनाक, रोहित मायनाक, अंकुल मायनाक, रोहन मायनाक, संदेश मायनाक आदी. भाजपा जिल्हा कार्यालय येथे उपस्थित होते.       दखल न्यूज महाराष्ट्र .

Exit mobile version