रत्नागिरी – दिवाळी निमित्ताने राज्यातील सुमारे ७ कोटी नागरिकांना देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या माध्यमातून चार जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र होत आहे, याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयातील भाजपाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक रेशन दुकानावर जाऊन प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्वसामान्य जनतेला शिधा वाटप करत व कोणतीही अडचण येत नाही याची जातिनिशी लक्ष् घालत आहेत. रत्नागिरी शहरातील भुते नाक्यावरील रेशन दुकान क्रमांक 8 वर जिल्हाध्यक्ष अँड.दिपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आले.आहे.

धनत्रयोदशीच्या व दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)
यावेळी अँड. दीपक पटवर्धन म्हणाले की,राज्यातील गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. आनंदाचा शिधा वाटप करणे म्हणजे सर्वसामान्य कुटूंबाची दिवाळी आनंदमय जाईल यात शंका नाही,हे सर्वसामान्यांचे सरकार असल्यानेच हा विचार केला जात आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण संपूर्ण महाराष्ट्राभर याकडे लक्ष ठेवून आहेत.रत्नागिरीतील सर्व रेशनिंग दुकांनावर चांगल्या प्रतीचा १ किलो रवा, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल स्वस्त दरात १०० रुपयांमध्ये या चार ही वस्तूंचे वाटप सुरळीतपणे सुरू आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष मून्ना चवंडे, दादा ढेकणे,विक्रम जैन ,शैलेश बर्डे, राजेंद्र शिंदे व नागरिक उपस्थित होते.
शुभेच्छुक : पंकज मारुती पुसाळकर
प्रभाग क्रमांक सात कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी