➡️ मेष : धावपळीमुळे आजारी पडल्यासारखी वाटेल थोडी विश्रांती घ्या. कुटुंबासाठी वेळ द्या. गरजवंताला मदत करा तुमचाच गौरव होईल. खरेदी कराल, थोडा खर्चही होईल.
➡️ वृषभ : निराशा पासून दूर राहण्यासाठी ध्यानधारणा करा. आज अनेक बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. मौल्यवान वस्तू जपून सुरक्षित ठेवा. जोडीदाराला वेळ द्या तो त्याचा अधिकार आहे. मित्र मंडळी बरोबर पार्टी जरूर करा पण त्यावर नियंत्रण ठेवा.
➡️ मिथुन : कामाचा ताण जाणवेल खर्चाचे प्रमाण वाढत असल्यामुळे तुमच्या योजना अडचणीत येतील. पुढील पिढीसाठी विशेष नियोजन कराल, आज खूप व्यस्त राहणार आहात छोट्या छोट्या कारणांमुळे घरात वाद करणे टाळा. स्वतःला शांत ठेवा; जेणेकरून तुमच्या सोबत घरातील सर्वांचा मूड चांगला राहील.
➡️ कर्क : आर्थिक प्रश्नावर इतकी ही गंभीर होऊ नका की त्याचा तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती प्रयत्न करेल, जोडीदाराची सोबत मिळेल. धार्मिक कार्यात स्वतःहून सहभागी व्हाल.
➡️ सिंह : पैसे खर्च होत असले तरी तुमच्याकडे पैसा येत राहील, काळजी करू नका. आरोग्याची काळजी करा आजचा तुमचा दिवस उत्तम असेल प्रवास आणि करमणूक आज होईल. रोमँटिक वातावरणाचा अनुभव घ्याल तुमच्या बुद्धीच्या कुवतीनुसार आज घरातल्यांना तुम्ही सल्ला द्याल.
➡️ कन्या : आरोग्य उत्तम राहील. धनप्राप्तीची शक्यता आहे. तुमच्या नातेवाईकांकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल मित्रमंडळी चांगला सल्ला देतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. सहकाऱ्यांशी मतभेद झाल्यामुळे काहीसा तणाव जाणवेल, आज टीव्हीवर कार्यक्रम पाहण्यात आणि आरामात राहण्यास पसंत कराल.
➡️ तुला : आनंदाचे क्षण घालवल्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहील. मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष केले तर परत आजारी पडाल, वेळ आणि धन याची कदर केली पाहिजे. आपल्या प्रिय व्यक्ती पासून दूर राहणे कठीण जाईल. थोडे वेगळे आणि एकट्याने वेळ घालवणे पसंद कराल, कामातील काही गोष्टी तुम्हाला त्रास देतील. तुम्ही आध्यात्मिक गुरूंकडे भेटण्यास जाऊ शकता.
➡️वृश्चिक : आज कामधंद्यामध्ये तुमचा दिवस चांगला राहणार आहे. व्यायाम करा. घरातील व्यक्तींकडून आर्थिक मदत होईल. कुटुंबातील सदस्यांची जवळीक साधून काम करा, कुटुंब हा एक तुमचा भक्कम आधार आहे हे विसरू नका. जोडीदाराबरोबर वेळ घालवणे अधिकपासून कराल.
➡️धनु : वाचन म्हणून चिंतन यावर लक्ष द्या सासरच्या पक्षाकडून धन मिळवण्याची शक्यता आहे, एखाद्या आलेले पत्र आनंदाची बातमी देऊन जाईल. लाभदायक अनेक घटक तुमच्या बाजूने असतील; आणि त्यामध्ये तुम्ही सर्वोच्च स्थानी असाल. तुमच्या दुःखद गोष्टी कोणाकडे तरी शेअर करू शकता.
➡️ मकर : आजचा तुमचा दिवस संमिश्र प्रकारचा असणार आहे. थोडा तणाव जाणू शकतो. पण काळजी करू नका आनंद आणि समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. आर्थिक बाजू चांगली राहील शुल्लक कारणामुळे कोणाशीही वाद घालू नका. प्रिय व्यक्तीने काही खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज व्हाल, मित्रमंडळींबरोबर वेळ घालवाल.
➡️ कुंभ : आज तुम्ही स्वतःला चांगले दिसाव यासाठी प्रयत्न कराल. आज तुम्हाला खूप मोकळा वेळ मिळेल, व्यवसायात तुम्हाला कुठेतरी नुकसान होऊ शकते. मात्र घरातील कोणा कडून गरजेच्या वेळी उत्तम साथ मिळेल. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. गुंतवणूक करू शकता.
➡️ मीन : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात चांगला नफा मिळेल. मित्रांबरोबर आनंदाचे क्षण घालवाल जीवनसाथीला वेळ अवश्य द्या. जीवनाचा आनंद अनेकांबरोबर शेअर करा.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्.

शुभेच्छुक : पंकज मारुती पुसाळकर
प्रभाग क्रमांक सात कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
धनत्रयोदशीच्या व दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)