जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आरसीएफ कंपनीस दिली भेट मृत व्यक्तींबाबत दिल्या आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना तर जखमींच्या उपचारांबाबत देखील केली विचारपूस..
प्रतिनिधी : मिथुन वैद्य.
अलिबाग – थळ येथील आरसीएफ कंपनीच्या एका प्लांटमध्ये सायंकाळी स्फोट झाला. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
या घटनेबाबत पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आरसीएफ कंपनीस तात्काळ भेट दिली व तेथील परिस्थिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी संबंधितांना मृत व्यक्तींबाबत पुढील आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या तसेच जखमी व्यक्तींच्या उपचारांबद्दलची विचारपूस केली.
स्फोटात मृत पावलेल्या व्यक्तींची माहिती-
1)दिलशाद आलम इद्रिसी- वय 29 – कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी, 2) फैजान शेख- वय 33- कुर्ला पश्चिम, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी, 3)अंकित शर्मा- वय 27- आर.सी.एफ कर्मचारी
जखमी व्यक्तींची माहिती-
1) अतिंद्र- कुर्ला पश्चिम, 90% भाजलेले, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल, 2) जितेंद्र शेळके- भाेनंग, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल, 3) साजिद सिद्दिक सलामती- कुर्ला पश्चिम, वय 23, फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई, या इस्पितळात उपचारार्थ दाखल.