रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे खास दीपावलीनिमित्त सदाबहार गीतांचा तेजोमय नादब्रह्म या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी २५ ऑक्टोबरला केले आहे. यामध्ये अभंग, भाव-भक्ती, नाट्यसंगीताची सुरेल मैफल रंगणार आहे. सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत ही मैफल वाचनालयाच्या भागोजीशेठ कीर सभागृहात आयोजित केली आहे.

दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. संदीप (बाबू ) सुर्वे.
(भाजपा शहर सरचिटणीस रत्नागिरी. )
तेजोमय नादब्रह्म या कार्यक्रमात रत्नागिरीतील प्रसिद्ध गायक आनंद पाटणकर, सौ. श्वेता जोगळेकर, अभिजित भट, नरेंद्र रानडे आणि वादक कलाकार हेरंब जोगळेकर, वरद सोहोनी, श्रीरंग जोगळेकर सहभागी होणार आहेत. वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या व रत्नागिरीच्या सांस्कृतिक चळवळीतील महत्त्वाची संस्था असलेल्या व १९५ वर्षे पूर्ण झालेल्या या वाचनालयातर्फे नेहमीच असे कार्यक्रम आयोजित केले जातात. दीपावलीनिमित्त संगीतमय मैफलीचा नजराणा रत्नागिरीतील रसिकांसाठी पेश केला जाणार आहे. या मैफलीला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि कार्यकारी मंडळाने केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. परशुराम उर्फ दादा ढेकणे.
(भाजपा ओबीसी युवाअध्यक्ष, रत्नागिरी.)