औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या भावना मांडल्या उद्धव ठाकरे यांनी त्यांना धीर देत मी तुमच्यासोबत सदैव आहे असे सांगत शेतकऱ्यांनी संघटित राहिलं पाहिजे व सुडाने पेटून उठा असे सांगितले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मी मदतीचा प्रस्ताव सरकार समोर ठेवेन असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं.

शुभेच्छुक : पंकज मारुती पुसाळकर
प्रभाग क्रमांक सात कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
जमलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांना भावनिक होऊन सांगितल्या. कर्जबाजारी होऊन आम्ही शेती केली मात्र सर्व शेती वाया गेली आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही! सावकाराकडून कर्ज काढले आहे. बँक वाले सुद्धा त्रास देत आहेत आम्ही करायचं तरी काय? असा सवाल करत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा होता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सत्ताधारी यांना घेरण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे उद्धव ठाकरे आजारी असताना देखील शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी बांधापर्यंत जात आहेत.
शुभेच्छुक : श्री.दामोदर लोकरे.
अध्यक्ष भाजपा मच्छिमार सेल रत्नागिरी जिल्हा.
पंचनामे कधी करणार, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल होऊन जातात. पंचनामे होईल, तेव्हा होईल. पण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. पंचनामे कधी करणार? तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल होऊन जातात. पंचनामे होईल तेव्हा होईल पण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. दखल न्यूज महाराष्ट्र.