दिवाळी सणानिमित्त रत्नागिरी बाजारपेठ सजू लागली..

दिवाळीची खरेदी रत्नागिरी बाजारपेठेतच करा ग्राहक व व्यावसायिक यांचा एकच सूर..

रत्नागिरी : यंदाच्या वर्षी दिवाळी सणावर कोरोनाचे सावट नसल्याने दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. मागील 2 वर्षे कोरोनाचे सावट, वाढलेली महागाई, कोरोनाकाळात वाढलेली बेरोजगारी, ऑनलाइन शॉपिंगला वाढत चाललेली ग्राहकांची पसंती, याचा परिणाम देखील खरेदीवर दिसून आला.
यावेळेस मात्र ग्राहकांचा बाजारपेठेत खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बाजारामध्ये विविध प्रकारचे दुकाने लावण्यात आलेली आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या आकाशकंदीलचे विविध प्रकार बघायला मिळत आहे, हाताने बनवलेल्या आकाशकंदिलांना ग्राहकांकडून पसंदी मिळत आहे. घरावर लावण्यासाठी लायटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत रंगीत आकाश कंदील, आर्टिफिशियल फुलांचे तोरण यांचे विविध प्रकार उपलब्ध आहे. दिवाळीत लावण्यात येणाऱ्या पारंपरिक पणत्या आणि दिव्यांचेदेखील विविध प्रकार यंदा बाजारात उपलब्ध आहेत. पूजेसाठी लागणारे झाडू, शिराई, बत्तासे, करदोडे, लक्ष्मी मातेची मूर्ती यांचेदेखील दुकाने लावण्यात आलेली आहेत.दिवाळीमध्ये नवीन कपडे खरेदीसाठी ग्राहक मोठी गर्दी करत असतात. यासाठी अनेक कापड दुकानांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कपड्यांच्या विविध प्रकारांबरोबर विविध प्रकारच्या सूट देऊ ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे. रत्नागिरी बाजारपेठ या सर्व वस्तुंनी सजली असून रत्नागिरीतील बाजारपेठेतच खरेदी करा असे संदेश सोशल मीडियावर फिरू लागले आहेत व स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version