स्वराज्य संस्था कोकणने भवानगडावर दिवे लावुन केली रोषणाई..

दिपावली दिवशी सालाबाद प्रमाणे याही वर्षी भवानगडावर स्वराज्य संस्था कोकणच्या वतीने दीपमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्वांनी सर्वप्रथम गडावर साफसफाई करण्यात आली त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, दिवे लावून भवानी देवीची पूजा करण्यात आली. गडावरती सर्व सर्वत्र रोषणाई करण्यात आली होती. त्यांनंतर फटाक्यांची आतिषबाजी करून जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे नावाचा जयघोष करण्यात आला.
यावेळी स्वराज्य संस्था कोकण संस्थापक अध्यक्ष अविनाश गुरव, सभासद अविनाश चव्हाण, संदेश साळवी, विशाल कडवईकर, किरण कांबळे, दीप गुजर, सुमित सुर्वे आणि स्वस्तिक गुरव आदी उपस्थित होते.

Exit mobile version