देवरुख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय, डेरवणच्यावतीने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत विद्यार्थिनींसाठी समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले होते. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व डॉ. सरदार पाटील यांनी डेरवण रुग्णालयाच्या तपासणी पथकाला पुष्प करंडक देऊन स्वागताने केला. डेरवण रुग्णालयाच्या पथकाने विद्यार्थिनींना आहार, आरोग्य, स्त्री समस्या याबाबत मार्गदर्शन व समुपदेशन केले. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक तपासणीनंतर ११ विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. या ११ विद्यार्थिनींच्या पालकांच्या संमतीने पुढील आरोग्य तपासणीसाठी डेरवण येथे आमंत्रित करण्यात आले. विद्यार्थिनींचे डेरवण येथे मोफत एकदिवशीय निवासी शिबिर आयोजित केले गेले. यावेळी विद्यार्थिनींना डेरवण रुग्णालयाच्या परिवहन सेवेद्वारे महाविद्यालयातुन घेऊन जाऊन परत प्रत्येक विद्यार्थिनीच्या मुक्कामी सुखरूप पोहोच करण्यात आले. या एकदिवशीय निवासी शिबिरामध्ये विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन टेस्ट व इतर पॅथॉलॉजिकल टेस्ट, त्वचा विकार तपासणी, बुद्ध्यांक चाचणी आणि सोनोग्राफी चाचणी मोफत करण्यात आली.

▶️ भारतीय जनता पार्टी पुरस्कृत यंग बॉईज ग्रुप आयोजित श्री दुर्गामाता चषक जिल्हास्तरीय नाईट हॉलीबॉल स्पर्धा परटवणे खालचा फगरवठार.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.
विद्यार्थिनींना महाविद्यालयात व डेरवण रुग्णालयात मार्गदर्शन, समुपदेशन आणि तपासणीसाठी डॉ. नेहा साबणे, मानसोपचार तज्ञ शिवानी टाकळे, आरोग्य समुपदेशक व मार्गदर्शक धनश्री सुतार व श्रद्धा खराडे तसेच परिचारिका सान्वी यादव यांनी मेहनत घेतली. वालावलकर रुग्णालय, डेरवण यांनी केलेल्या मौलिक सहकार्याबद्दल प्रा. धनंजय दळवी यांनी आभार व्यक्त केले. विद्यार्थिनींच्या संपूर्ण तपासणी कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये, प्रा.मयुरेश राणे, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. विजय मुंडेकर प्रा. अभिनय पातेरे, अक्षय भुवड व तांत्रिक सहाय्यक संतोष जाधव यांनी मेहनत घेतली. संपूर्ण तपासणी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी कौतुक केले.
फोटो- वालावलकर रुग्णालय पथकातील सदस्य उपस्थित विद्यार्थिनींशी हितगुज करताना सोबत प्रा. सीमा शेट्ये.
छाया- प्रा. धनंजय दळवी.