धामणसें येथे आनंदाचा शिधा याचे वाटप; धामणसें विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा पुढाकार

धामणसें – दिवाळी निमित्ताने राज्यातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या माध्यमातून चार  जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र होत आहे.रत्नागिरी तालुक्यातील धामणसें गावात धामणसें विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेड धामणसें येथे आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.
       यावेळी सोसायटीचे चेअरमन श्रीकांत देसाई,सरपंच विलास पांचाळ, धान्य वाटप कमीटीचे अध्यक्ष दिपक जाधव,सोसायटीचे संचालक व भाजपा तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी,दिलीप तांबे, सचिव सुनिल लोगडे,मापारी पाल्ये ,पाचांळ उपस्थित राहून जातीने लक्ष ठेऊन आहेत. यावेळी सोसायटीचे चेअरमन श्रीकांत देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, चांगल्या प्रतीचा १ किलो रवा, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल स्वस्त दरात १०० रुपयांमध्ये या चार ही वस्तूंचे वाटप सुरळीतपणे सुरू असून गावातील सर्व लाभधारकांना याचा लाभ मिळणार आहे.यामुळे सर्वसामान्य लोकांची दिवाळी आनंदमय जाणार आहे.
        यावेळी भाजपा तालूकासरचिटणीस उमेश कुलकर्णी  म्हणाले की,ग्रामीण भागात ही सर्वसामान्य पर्यंत व्यवस्थित आनंदाचा शिधा वाटप होत असून  गावातील 425 कार्डधारक व्यक्ती ना लाभ मिळणार आहे .ग्रामीण भागात ह् देव दिवाळी यामुळे  आनंदमय होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पूरवठा मंञी रविंद्र चव्हाण यांच्या सरकारने घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे.

जाहिरात..
Exit mobile version