कुडाळ : गेले काही दिवस भारतातल्या चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असावा तर काही पक्षांच्या नेत्यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महारांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आशा थोर पुरुषांचे फोटो असावेत अशी मागणी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याची सुरुवात अरविंद केजरीवाल यांनी केली त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील अशा प्रकारची मागणी केलेली पाहायला मिळाली.
याच दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला 25 पैशाच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावून सोशल मीडियावर व्हायरल केला गेला. या प्रकरणी कोकणातले भाजप आणि राणे समर्थक प्रचंड आक्रमक झाले असून याप्रकरणी कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या जागी राणे साहेबांचा फोटो एडिट करून संविधानाचा देखील अपमान करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.
25 पैशाच्या नाण्यावर राणेंचा फोटो; कोकणात भाजप आक्रमक, कुडाळ येथे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.
