➡️ मेष : आजचा दिवस अतिशय सुंदर आहे. धनप्राप्तीचे योग असून वडिलांकडून धन मिळेल. धार्मिक कार्यत व्यस्त रहाल. अविवाहित असाल तर विवाह जुळण्याचे योग आहे. विद्यार्थ्यांसाठी लाभदायी दिवस आहे. आजारी असलेल्या व्यक्तींना आज आराम जाणवेल.
➡️ वृषभ : आरोग्याकडे लक्ष द्या. कोणत्याही प्रकारच्या विवादात आपण पडू नका. वैवाहिक जीवन चांगले असेल, अडचणी दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगला दिवस आरोग्याकडे लक्ष द्या. मोठी समस्या दूर करण्यासाठी आपण आज प्रयत्न करणार आहात. घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
➡️ मिथुन : आज एखादी खूप चांगली बातमी मिळेल ज्याने तुम्ही खुश व्हाल. आजचा दिवस तुमचा उत्साहाचा असणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. आजच्या दिवशी तर महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल, चांगली संधी मिळेल.
➡️ कर्क : मानसिक अडचणीत वाढ होईल, वाद टाळा. धार्मिक कार्यात वाढ होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. वैवाहिक सुखात वाढ होईल. कुटुंबातील वृद्ध महिलेकडून धनप्राप्ती होऊ शकते. शैक्षणिक कार्यात अडथळे येतील. संभाषणात संयम ठेवा.
➡️ सिंह : मन शांत राहील, पण संभाषणात संयमित राहा. कार्यक्षेत्रात बदलासोबत नोकरीत बदलाची शक्यता आहे. मालमत्ता उत्पन्नाचे साधन बनू शकते. काम जास्त होईल. काही जुने मित्र भेटू शकतात. जास्त राग टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक आणि संशोधन कार्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. परदेश दौऱ्यावर जावे लागू शकते. तब्येतीची चिंता राहील.
➡️ कन्या : कुटुंबाचे सहकार्य मिळेल. लेखन-बौद्धिक कामांमुळे उत्पन्न वाढू शकते. व्यवसायात सुधारणा करण्यासाठी वडिलांकडून पैसे मिळू शकतात. क्षणभर नाराजीची स्थिती असेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. भेटवस्तू म्हणून कपडे मिळू शकतात. पालकांना आरोग्याच्या समस्या असू शकतात. नोकरीत अधिकाऱ्यांमध्ये वैचारिक मतभेद वाढू शकतात. चांगल्या स्थितीत असणे.
➡️ तुला : नेहमी आशावादी रहा आपली स्वप्ने नक्की पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. बचतीकडे लक्ष द्या. कोणत्याही कामात तुम्हाला सकारात्मक निकाल मिळेल. आजचा दिवस वैवाहिक आयुष्यातही चांगला असणार आहे.
➡️वृश्चिक : आरोग्यामध्ये सुधारणा येईल. कुठल्याही कामात पडत असताना त्याचे बजेट बनवा. समस्यांवरती मार्ग मिळेल. विद्यार्थ्यांसाठी देखील आजचा चांगला दिवस असणार आहे. आर्थिक व्यवहारात लक्ष द्या. आत्मविश्वास सांभाळा की तुमची ताकद आहे.
➡️धनु : मान सन्मान वाढेल. उत्पन्नाचे नवीन साधन तयार होईल. आजचा उत्तम दिवस आहे. तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. कोणाही विषयी गैरसमज करू नका. धन आल्याने आर्थिक अडचण दूर होईल.
➡️ मकर : परिवारासाठी आज वेळ द्याल. कामावरील व्यक्तींचे गैरसमज दूर कराल. एखादा शांत बसून आपल्या समस्यांचा विचार करा आणि त्यावर उपाय शोधा. तणावाच्या परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवा. सासरवाडीत आणि त्या संबंधित लोकांशी वाद घालू नका.
➡️ कुंभ : महिलांची व्यवहार चांगले ठेवा. प्रेम प्रकरणात जोडीदाराची चांगला व्यवहार ठेवा. व्यवसायाकडे आणि घराकडे वेळ द्या. इतरांच्या मदतीसाठी धावून जात आहात पण त्यामुळे आपल्या घराचे दुर्लक्ष होणार नाही ना याची काळजी घ्या.
➡️ मीन: परिवारातील व्यक्तींचा सल्ला घ्या. लोक काही गोष्टी तुम्हाला आज विरोध करतील त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नका. समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा. व्यवहारामध्ये लापरवाही करू नका. घरातील वातावरण चांगले राहील.
दखल न्यूज महाराष्ट्र.
राशी भविष्य(३० ऑक्टोबर २०२२)दैनिक राशीभविष्य
