संगमेश्वर :- कडवई आणि परिसरातील गावांमध्ये गेली अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.वादळ पाऊस असो नसो एकही दिवस असा जात नाही कि विज जात नाही.अनेकवेळा तर व्यवसायाच्या वेळेस तासनतास विज नसते.यामुळे व्यापारी वर्गाला त्रासाबरोबरच आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.याबाबतीत व्यापाऱ्यांकडून अनेक वेळेस तक्रार करून देखील परिस्थिती तीच असल्याने भारतीय जनता पार्टीचे संगमेश्वर तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, भारतीय जनता युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गुरव,जिल्हा उपाध्यक्ष हरीभाई पटेल, तालुका उपाध्यक्ष मिथून निकम,गणेश पवार यांनी महाराष्ट्र विज वितरण कंपनी संगमेश्वरचे मा.उपकार्यकारी अभियंता मोगल यांची भेट घेतली आणि लवकरात लवकर याबाबत उपाययोजनां कराव्यात असे निवेदन दिले.
कडवई धरिसरासाठी केवळ आरवली फिडर वरून वीजपुरवठा जोडलेला आहे.त्यासोबत संगमेश्वर फिडर वरून देखील विजेची जोडणी तातडीने करून विज पुरवठ्यात नियमितता आणून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच करजुवे परीसरात अनेक ठिकाणी गंजलेल्या अवस्थेतील पोल लवकरच बदलून मिळावे अशी मागणी देखील केली आहे. यावर तातडीने उपाययोजना करून मार्ग लवकरच मार्ग काढू असे सकारात्मक आश्वासन श्री.मोगल यांनी दिले.