➡️ मेष : तुमची बौधिक्तता तुम्हाला अनेक गोष्टीत तारणार आहे. पुढील नियोजन करून गुंतवणूक करा. कुटुंबातील प्रश्न आधी सोडवा, त्याला महत्व द्या. आज कोणाशीही कटू बोलणे टाळा. व्यर्थ कामात वेळ घालवू नका.
➡️वृषभ : मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. मुलांना मिळालेल्या यशामुळे तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. आज काहीसा वेगळा अनुभव मिळणार आहे. प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील.
➡️ मिथुन : व्यवसायामध्ये चांगला फायदा होणार आहे. नवीन प्रकल्प हाती घ्याल, आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढाल. घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करण्याची इच्छा होईल. कलाक्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यस्त दिवस आहे; त्यामुळे तुमच्या जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, आणि नंतर समजूनही घेईल.
➡️कर्क : तेलकट खाणे टाळा. नवीन खरेदी करण्याआधी आपल्याकडे ती गोष्ट आहे का हे पहा. आजचा दिवस मित्रमंडळींबरोबर चांगला जाणार आहे. काही अडथळे येतील आणि ते दूर करताना थोडा त्रासही होईल. आज तुम्ही थोडे मोकळ्या वातावरणात फिरणे पसंत कराल.
➡️सिंह : कौटुंबिक अडचणी बरोबर घरच्यांशी चर्चा करा. प्रेमळ दांपत्य म्हणून जगतायावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे घरातील शांतता सौंदर्य आनंद याचा अनुभव आज घ्याल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. आपला महत्त्वाचा वेळ काही कारणाने खराब होईल. नातेवाईक हे तुमच्या भांडणाचे कारण असू शकते. एकमेकांना समजून घ्या.
➡️कन्या : सशक्त मन हे सशक्त शरीरामध्ये वास करते, तुम्हाला आज अफलातून कल्पना सुचतील कोणाशी बोलताना वाद विवादित विधान टाळा. आज तुमचा जोडीदार रोमँटिक मूडमध्ये असेल. रिकाम्या वेळी चर्चा करा, आणि काय गैरसमज असतील ते दूर करा.
➡️तुल : कामात व्यस्त असाल त्यातूनही विश्रांती घेण्याकडे तुमचा कल असेल आणि विश्रांती आवश्यक घ्या. जुनी आजार तुम्हाला चिंतित करू शकतात. गरजेचे काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल तुमची व्यावसायिक करिअर बाबत प्रगती होणार आहे. तुमच्या कामाला आज दाद मिळेल.
➡️वृश्चिक : आज कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. ताण घेतल्याने तुमची प्रकृती बिघडू शकते सहकुटुंब सामाजिक कार्यात सहभागी व्हा, त्यातून तुम्हाला आनंद मिळेल लग्नाच्या बाबतीत निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या जोडीदार तुम्हाला आज मदत करेल.
➡️धनु : स्वास्थ्य उत्तम राहणार आहे. तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही वेळ घालवू शकता. आजचा दिवस चांगला आहे. फायदेशीर आहे, तुम्ही एखाद्याला दुखावले असाल तर त्याची माफी मागा. चुकून चुकांची पुनरावृत्ती करू नका. जोडीदाराशी आज भांडणे टाळा.
➡️मकर : आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल आज तुमचा वेळ चांगल्या कामासाठी लागू होईल. विवाहित लोकांना सासरच्या पक्षाकडून धनलाभ होईल. कोणत्याही कामासाठी धीर धरा जीवनसाथी बरोबर काहीसे वाद होतील असं काहीतरी करा ज्यामुळे तुमचा जोडीदार खूप खुश होईल.
➡️कुंभ : अडकलेले मानधन मिळेल. दिवस शांत आणि आनंदी असेल मानसिक स्थिती उत्तम ठेवणे हे तुमच्या हातात आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात याचा आज विचारच करू नका. रिकामे वेळी तुम्ही कोणासोबत तरी भेटणे पसंत कराल जोडीदाराबरोबर वेळ घालवणे महत्त्वाचा आहे.
➡️मीन : आज न बोलता उधार दिलेले पैसे मिळतील, पैसे कमवण्यासाठी नवीन कल्पना डोक्यात येतील. ज्या तुम्ही भविष्यासाठी बनवू शकता. वैवाहिक जीवन उत्तम असणार आहे. प्रेमाचा अनुभव घ्याल.
दखल न्यूज महाराष्ट्र.
➡️ राशि भविष्य31 ऑक्टोबर 2022
