रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, यंग बॉईज ग्रुप आयोजित श्री रत्नदुर्गा माता चषक जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन परटवणे, खालचा फगरवठार रत्नागिरी येथे करण्यात आले होते. ही स्पर्धा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपकजी पटवर्धन रत्नागिरी शहर उपाध्यक्ष श्री नितीनजी जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेतली गेली. यासाठी यंग बॉईज ग्रुप येथील सर्व तरुण, सर्व खेळाडू यांनी विशेष मेहनत घेतली.
परटवणे खालचा फगरवठार प्रभाग क्रमांक एक येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षीस समारंभ भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष नितीन जाधव, जिल्हाअध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्याहस्ते 30 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. यावेळी स्थानिक माजी नगरसेविका प्रणाली रायकर, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष सचिन करमरकर, महावीर जैन, संदीप रसाळ, नवनिर्वाचित शिरगाव ग्रामपंचायत सदस्य कांचन गोताड, निलेश मराठे, राकेश सुवरे, ऋषिकेश सुवरे, महेंद्र मांडवकर, वैभव पटवर्धन,संदीप मांडवकर आदी आवर्जून उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक चा मानकरी विजेता संघ यंग बाॅईज ग्रुप हा ठरला या संघास १५,००० (पंधरा हजार रुपये) रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. तर भगवती स्पोर्टस् हा संघ उपविजेता ठरला या संघास १०,००० (दहा हजाररुपये) रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय बेस्ट प्लेयर ऑफ टूर्नामेंट, बेस्ट स्मॅशर, बेस्ट लिफ्टर, बेस्ट लिबरो अशी विशेष पारितोषिके देखील या स्पर्धेमध्ये देण्यात आली. स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा प्रेमी शहरवासीयांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
या स्पर्धेसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपकजी पटवर्धन, भाजपा उपशराध्यक्ष नितीनजी जाधव, बूथ प्रमुख राकेश सुवरे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष ऋषिकेश उर्फ बंटी सुवरे, जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष अभिजीत शेट्ये, शहराध्यक्ष सचिन करमरकर, नगरसेविका प्रणालीताई रायकर यंग बॉईज ग्रुप परटवणे, खालचा फगरवठार. आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.
