जयगड चरेवाडी येथे गळफास घेत युवकाने केली आत्महत्या..

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युवकांचे आत्महत्या हा एक प्रश्नच निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक युवकांनी आत्महत्या केले आहेत. तरुणांची मानसिकता बिघडण्याचे कारण काय असा सवाल केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी देखील यावर काम करणार असल्याचे सांगितले आहे.
        रत्नागिरी तालुक्यातील जयगड चरेवाडी येथील युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी प्रेम प्रकरणातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. कालच पहाटे कोळीसरे येथील नव दम्पत्याने आत्महत्या केल्यानंतर रात्री ही घटना घडली आहे.
          राहुल एकनाथ जांभळे (२३) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल याने रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घराच्या लोखंडी बारला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी त्याची आई आणि भाऊ नंदिवडे येथे डॉक्टरकडे गेले होते. दोघे परत आल्यावर राहुलने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. जयगड पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. याबाबतचा अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

Exit mobile version