➡️ मेष : उधार दिलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. लोक तुमच्या विषयी गैरसमज करून घेऊ शकतात. पण स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा कोणत्याही परिस्थितीत राग करू नका शांत रहा.
➡️ वृषभ : आर्थिक लाभासाठी तुम्ही कुठली योजना आखली असेल तर ती पूर्ण होईल. थांबलेली कामे सुरू होतील. मनात सुख आणि शांती असेल. व्यक्तिगत जीवनात कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. कोणतीही मीटिंग अथवा सल्ला घेताना तुमच्या मनात त्याची रूपरेषा ठरवा. तुमच्या प्रिय व्यक्तीला आपण वेळ द्या. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.
➡️ मिथुन : आज तुमचा समाजामध्ये मानसन्मान वाढेल. मंगलमय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. मुलांच्या हालचालींकडे लक्ष ठेवा आणि त्यांना मार्गदर्शन करा. मार्केटिंग क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.
➡️ कर्क : तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये गती येईल, कार्यप्रणाली मध्ये सुधारणा होईल. सहकार्यांबरोबर वाद विवाद करणे टाळा. वाहन खराब झाल्याने थोडा खर्च जाणवू शकतो. पैसा महत्त्वाचा आहे पण त्यामुळे आपले लोक आपल्यापासून दूर होणार नाहीत याच्याकडे लक्ष द्या.
➡️ सिंह : दिवस चांगला असणार आहे. थांबलेले काम सुयोग्य पद्धतीने होतील. आपली योग्यता नुसार व्यवसाय करणे उचित राहील. रागावर नियंत्रण ठेवा.
➡️ कन्या : कामाचा थोडा व्याप राहील. तुमच्या कामात दिवसभर तुम्ही व्यस्त असाल. तरीही मौज मस्तीसाठी काहीसा वेळ काढाल. मित्रांबरोबर चॅटिंग करण्यात,बोलण्यात थोडा वेळ घालवला .
➡️ तुला : दिवस चांगला असून अनुभवी लोकांचे मार्गदर्शन लाभेल. आणि त्यातूनच तुम्हाला यश मिळेल. कोणीतरी सामाजिक संस्था यांच्याबरोबर आपला संबंध येईल मानसन्मान वाढेल कोणत्याही कामात सतर्क राहणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात सावध रहा.
➡️वृश्चिक : ज्या विशेष कामात तुम्ही आहात तेथे तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कामांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल.
➡️धनु : तुमच्या मनात असलेली काम पूर्ण करण्यासाठी वेळ नक्की काढा, ज्याचे तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. मुलांच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता पहा यावेळी कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका.,ज्यामुळे तुम्ही तणावात जाल आपले व्यवहार अधिक चांगले आणि मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा.
➡️ मकर : दिवस तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. योग्यते नुसार काम करा. मिळणारे सुख हे सकारात्मक असून त्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल कोणत्यातरी गंभीर विषयावर चर्चा होऊन त्यातून मार्ग मिळेल शांत राहून चर्चा करा.
➡️ कुंभ : धार्मिक कार्याविषयी काहीतरी योजना बनवाल आजचा दिवस थोडासा व्यस्त असणार आहे. घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद तुम्हाला आज मिळणार आहे. कोणतेही काम धावपळीत करू नका. त्यामुळे व्यापारामध्ये काहीसे नुकसान होऊ शकते. आजचा आपला दिवस उत्तम जाईल.
➡️ मीन : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून आज दूरच रहा. कौटुंबिक आनंदात अधिक उत्साहाने सहभागी व्हाल. जीवनाचा आनंद आपल्या लोकांमध्ये राहण्यात आहे.
▶️ *दखल न्यूज महाराष्ट्.*
राशी भविष्य(२ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य
