साळवी स्टॉप ते नाचणे लिंक रोड रस्त्याचे श्रेय फक्त माजी नगराध्यक्ष, तालुका प्रमुख बंड्या साळवी यांचेच : शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा समन्वयक संजय पुरसकर.

रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी उभे राहून फोटो काढत श्रेय घेणाऱ्यांना संजय पुरसकर यांनी सुनावले.

रत्नागिरी : शिवसेना तालुकाप्रमुख तथा मा. रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी ह्यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते नाचणे लिंक रोड बरेच दिवस खराब झालेला होता. त्याबाबत ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी ह्यांच्या कार्यकाळात त्यांनी मंजूर लेलेला हा रस्ता आहे. आणि कामाला प्रत्यक्षरीत्या सुरुवात झाल्यानंतर अन्य कोणी कामाच्या ठिकाणी उभे राहून फोटो काढून जर याचे श्रेय घेत असेल तर ते चुकीचे असल्याचे ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी शहरातील कोट्यावधी रुपयांची रस्त्यांची कामे ही शिवसेना ठाकरे गट यांच्याच प्रयत्नामुळे झाली आहेत. आणि याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असून जनतेसमोर जाताना हे काम आम्हीच केले असे भासवले जात आहे तरी प्रत्यक्षात हे काम माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी यांच्याच नेतृत्वात मंजूर झाले आहे असे संजय पुनसकर यांनी सांगितले.
रस्त्याचे प्रत्येक्षात आज कामाला सुरुवात झाली असून त्याबद्दल परिसरातील नागरिकांनी खराब रस्त्यापासून सुटका केल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख तथा मा. रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी ह्यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version