अट्रोसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे; रिपाई आपल्या भूमिकेवर ठाम – सुशांत भाई सकपाळ.

खेड : मागासवर्गीय निधीचा गैरवापर करून. स्वतःचा सार्थ साठी आपल्या राजकीय पदाचा वापर करणारे लोक प्रतिनिधी तर जाणुन बुजून निधी खर्ची टाकण्या साठी मदत करनारी येथील यंत्रणा बाबत अट्रोसिटी चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे या भूमिकेवर रिपाइं ठाम असून गुन्हा दाखल न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात असल्याचा इशारा रिपाइं चे कोकण संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांनी एका प्रसिद्ध पत्रका द्वारे दिला आहे. मागासवर्गीय यांचा हक्क हिरावून घेऊन त्यांच्या वाट्याचा असलेला निधीचा दुरूपयोग झाला आहे आणि शासनाची दिशाभूल केली आहे. यात मदत करणारी येथील यंत्रणा देखील कारणीभूत आहे. मग असे असताना वैभव खेडेकर आपल्या अंगावर का घेत आहेत असा सवाल ही सकपाळ यांनी उपस्थित केला आहे
निधीचा गैरवापर झाला हे सिद्ध झाले म्हणून त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला जे ते दोषी नसतील तर कशाला घाबरत आहेत. कर नाही त्याला डर कशाला असा सल्ला ही त्यांनी देत दोन समजामध्ये तेढ निर्माण होईल. असे कृत्य त्यांनी करु नये पोलिस तपास यंत्रणा मध्ये ते अडथळा निर्माण न करता त्यांना सहकार्य करण्याची भूमिका असणे गरजेचे असताना नाहक गुन्हे दाखल करून पोलिसांना बदनाम करण्याचे काम खेडेकर यांच्या कडून होत आहे. भरणे बौद्ध वाडी निधी परस्पर लुटला या कृतीला आमचा विरोध व तो कायम राहणार केलेल्या कृत्याला त्याला विरोध करत आहे कोणाला टार्गेट करण्यात आम्हाला कोणताही रस नसल्याचे सकपाळ यांनी स्पष्ट केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version