केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत गणेशगुळे येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ.

गणेशगुळे : काल गुरुवार दिनांक 3/11/22 रोजी गणेशगुळे ग्रामपंचायत कडून केंद्र शासनाच्या (जलजीवन मिशन योजने) अंतर्गत 76 लाखाच्या नळपाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा भारतीय जनता पार्टीचे सरपंच श्री.संदीप शशिकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. दीपक पटवर्धन तसेच तालुका अध्यक्ष श्री.मुन्ना चवंडे, सरचिटणीस उमेश कुलकर्णी, ओमकार फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
5 वर्षांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने गावातल्या ग्रामस्थांना पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. सरपंच संदीप शिंदे यांनी ही योजना लवकरात लवकर मंजूर व्हावी. या साठी भरपूर मेहनत घेतली. त्यांच्या या प्रयत्नांन मुळे आज योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. सरपंच संदीप शिंदे यांचा कार्यकाळ संपायला 10 दिवस उरलेले असताना त्यांनी 5 वर्षात विकास कामांसाठी घेतलेल्या मेहनतीचे ग्रामस्थांनी कौतुक करत असे सरपंच आज पर्यंत पाहिले नसल्याची भावना व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सांगितले, जरी पुढील निवडणुकीत महिला आरक्षण पडले असले तरी, आपणच गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत रहावे अशी विनंती केली. तसेच भारतीय जनता पार्टीचे विचार संपूर्ण जिल्हा परिषद गटात पसरवून नेतृत्व करावे असे आवाहन केले.
सरपंच संदीप शिदे यांनी आपल्या भाषणात सर्वांचे आभार मानत, आपण दिलेली 5 वर्षाची साथ व भाजपाचे विचार या मुळेच आपण हा कार्यकाळ यशस्वी रीत्या पार पाडू शकलो व विविध विकास कामांना न्याय देऊ शकलो, तसेच लोकांना पाणी देणं हे मी माझे भाग्य समजतो गणरायाच्या कृपेने मी हे करू शकलो. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सर्व सदस्य,भाजपा पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र.

    एकादशी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..                 शुभेच्छुक : निलेश उर्फ (भाऊ) आखाडे.
Exit mobile version