रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध धंद्याची वाढती उपलब्धता यावर कठोर कारवाई करण्यात यावी मनसेची पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्याकडे मागणी.

रत्नागिरी : जिल्ह्यातील अवैध गावठी दारूधंदे, गोवा बनावटी दारू, बेटींग, अंमली पदार्थाची वाढती उपलब्धता यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मनसेचे काजिर्डा चे संरपच कै.श्री. अशोकजी आर्डे यांचा संशयास्पद झालेला मृत्यू या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रत्नागिरीच्या वतीने आज नूतन पोलिस अधिक्षक मा.श्री. धनंजय कुलकर्णी साहेब यांची भेट घेण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्याची समस्या आपण अतिशय गांभीर्याने घेतली असून यावर लवकरच धडक कारवाई रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात येईल असे मनसे शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले..यावेळी मनसे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. अविनाशजी सौंदळकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. रूपेशजी जाधव, शहर संघटक श्री. अखिल शाहू, विभाग अध्यक्ष श्री. जयेश फणसेकर, श्री. सोमनाथ पिलणकर, श्री. संतोष काजारे, दिलदार प्रबुलकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version