राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी राबवली खेडशी गावात स्वच्छता मोहीम..

रत्नागिरी – भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास,कीर महाविद्यालयाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीरात दोन दिवस स्वयंसेवकांनी
स्वच्छता मोहीम राबविली. दोन दिवसाच्या श्रमदानातून खेडशी गावातील मंदिर परिसराची स्वच्छता व खेडशी ग्रामपंचायत परिसराची स्वच्छता केली. स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी सरपंच सौ. जान्हवी घाणेकर, उपसरपंच सौ. मानसी पेडणेकर, ग्रामसेवक संजय लोखंडे, पाणीपुरवठा सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्पाधिकारी प्रा.हरेश केळकर, प्रा विनय कलमकर, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. *दखल न्यूज महाराष्ट्र.*

Exit mobile version