राष्ट्रीय पांडुलिपी संस्थेच्या प्रमुखपदी प्रो(डॉ) अनिर्बाण दश नियुक्त.

पुणे : भारतासह अनेक देशांच्या प्राचीन लिपींचे जाणकार, प्रो (डॉ) अनिर्बाण दश यांची नुकतीच राष्ट्रीय पांडुलिपी मिशन अर्थात National Mission for Manuscripts या संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. प्राचीन भारताच्या जवळपास ३५ लिपींचे जाणकार असलेल्या डॉ. दश यांनी भूतान, चीन (तिबेटसह), श्रीलंका, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, मलेशिया, जर्मनी, कोपेनहेगेन, जपान आणि डेन्मार्क देशांत अनेक प्राचीन हस्तलिखित ग्रंथांचे लिप्यांतर कार्यशाळा घेतल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पालि व बौद्ध अध्ययन विभागात ते काही काळ कार्यरत होते. नंतर सारनाथ येथील सेंट्रल इन्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन स्टडीज येथे कार्यरत होते. जगभरातील ८० विद्यापीठांत त्यांनी भारतातील प्राचीन लिपींवर कार्यशाळा घेतली आहे. डॉ.दश यांनी “इयं धम्मलिपि”, “शारदा लिपि” ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. सध्या ते संस्कृत बौद्ध शब्दांची पुस्तिका तयार करीत आहेत. नाशिकमध्ये देखील प्राचीन लिपींवर अनेक कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत. भारताच्या प्राचीन लिपींचे संवर्धन करणाऱ्या मानद संस्थेवर डॉ.अनिर्बाण दश यांची नियुक्त झाल्याने, त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.
मूळचे कटक, ओरिसा येथील रहिवासी. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संस्कृत भाषेत केले. तेथेच त्यांनी Ph D प्राप्त केली. कॉलेज मध्ये असल्यापासून त्यांना लिपी बद्दल आकर्षण वाढले आणि ते भारतातील वेगवेगळ्या लिपिंचा अभ्यास करू लागले. बौद्ध साहित्याचा अभ्यास करताना त्यांना प्राचीन लिपीमध्ये लिहिलेली हस्तलिखिते वाचण्यासाठी त्या त्या लीपिंचा अभ्यास करावा लागला. लिपींचा अभ्यास करण्यात त्यांना रस वाटू लागला आणि कमी वेळात एखादी लिपी कशी शिकता येईल यावर त्यांनी अभ्यास करून एक शास्त्रशुद्ध प्रणाली विकसित केली. राष्ट्रीय पांडूलिपी मिशन या संस्थेतील वेगवेगळ्या कार्यशाळेत ते लिपी शिकवू लागले. त्यांची पद्धत विद्यार्थ्यांना इतकी आवडली की भारतातील जवळपास सर्वात विद्यापीठामध्ये त्यांची कार्यशाळा होऊ लागली. पुढे प्राचीन बौद्ध साहित्य व हस्तलिखित अभ्यास करण्यासाठी त्यांना परदेशातील विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळाली. तेव्हा त्यांनी तेथे देखील प्राचीन भारतीय लीपिंची कार्यशाळा घेतली. त्यांना उपप्रद्यापक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पालि विभागात नोकरी लागली. नंतर ते प्राध्यापक म्हणून सारनाथ येथील CIHTS मध्ये रुजू झाले. सध्या ते अनेक प्राचीन बौद्ध ग्रंथावर काम करीत असून अनेक जागतिक विद्यापीठात प्राचीन लीपिंचे सल्लागार देखील आहेत.
दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version