➡️ मेष : परिवारामध्ये आज एखादी शुभ कार्य करण्याचे आपण ठरवू शकता. तुमच्या कार्यक्षेत्रात काही शत्रू तुमच्यापेक्षा वरचढ होऊ शकतील. नोकरी करण्याचे ठिकाण बदलण्याची इच्छा असेल तर त्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतील. परिवारातील व्यक्तींच्या आरोग्यामुळे आपण काहीसे चिंतित असाल.
➡️ वृषभ : आज तुमच्या बोलण्यामध्ये मधुरता असली पाहिजे; तीच तुम्हाला मानसन्मान मिळवून देईल. आज कोणालाही धन उधार देऊ नका शक्यतो कोणाकडून घेऊही नका. कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल जुन्या कोणत्यातरी चुकीची आज तुम्हाला माफी मागावी लागू शकते.
➡️ मिथुन : आजचा दिवस अतिशय सुंदर स्वरूपाचा असणार आहे. कलात्मक क्षेत्रातील लोकांसाठी आज लाभाचा दिवस आहे. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला जनसंपर्क चांगला मिळेल. पारिवारिक जीवन सुंदर असणार आहे.
➡️ कर्क : आज महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला तुमच्या बुद्धीने घ्यावे लागणार आहे. खर्च करताना विचारपूर्वक करा नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. कोणतेही सूचना मिळाल्यानंतर त्याबाबत सावधगिरीने पावले टाका. कोणीतरी पाहुणे आल्याने तुम्हाला त्याचा लाभ होईल.
➡️ सिंह : आजचा तुमचा दिवस आर्थिक बाबतीत काहीही समस्या घेऊन येऊ शकतो. तुमच्या व्यापारातील काही समस्या आज मान वर करतील. आपला व्यवसाय आणि आपले कुटुंब या व्यतिरिक्त इकडे तिकडे मन लावू नका. आज तुम्ही तुमच्या मित्राच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल.
➡️ कन्या : अनेक गोष्टीत आज तुम्हाला तडजोड करावी लागणार आहे. स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्या. पद प्रतिष्ठा वाढल्याने त्याचा अहंकार मनात ठेवू नका. शुभमांगलिक कार्यक्रम होऊ शकतो. विवाद पासून दूर राहा.
➡️ तुळ : व्यावसायिक क्षेत्रात आज तुमचा दिवस काहीसा कमजोर असणार आहे. अध्यात्मिक कार्यात भाग घेऊन तुम्ही आज प्रसन्न राहाल जुने कर्ज आज तुम्हाला त्रास देईल. परिवारासाठी वेळ द्या.
▶️ वृश्चिक : कोणत्यातरी कारणाने तुम्हाला इजा होऊ शकते. त्यामुळे सावध राहा. कोणतीही समस्या चर्चेतून सोडणे योग्य राहील. त्यासाठी प्रयत्न करा मित्र आणि जीवनसाथी दोघांचीही साथ आज उत्तम मिळणार आहे.
➡️धनु : भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. म्युचल फंड अधिक क्षेत्रात निवेश करणे फायद्याचे राहील. तुम्हाला आज अनेकांकडून चांगली मदत मिळू शकते. वैवाहिक जीवन उत्तम राहील.
➡️ मकर : आरोग्य विषय चिंता जाणवत राहील. बचत करण्यासाठी तुम्ही एकमेकांची मदत आणि सल्ला घेऊ शकता. मित्रमंडळींबरोबर बाहेर जाण्याचा योग येईल. कार्यालयातून लवकर येऊन आज तुम्ही स्वतःच्या आवडीचे काम करून स्वतःचे मन शांत करू शकता.
➡️ कुंभ : मोठ्यांच्या सल्ल्याने तुम्हाला लाभ होईल. मुलांची संबंधित विषयांमध्ये लक्ष द्या. आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. इतरांकडे काहीतरी शिकण्यासारखे आहे हे लक्षात ठेवून काम करा.
➡️ मीन : जुन्या आठवणींमध्ये रमाल तुम्ही स्वतःला मानसिक तणाव देऊ शकता. कोणत्याही बाबतीत जास्त चिंता करणे योग्य नाही शांत रहा. आजच्या दिवसात झालेला प्रवास तुमच्या हिताचा आणि सकारात्मक गोष्टी देणार असेल. वैवाहिक जीवनात आजचा दिवस अतिशय सुंदर आहे. जोडीदार आज तुमच्यावर खुश असणार आहे.
▶️ *दखल न्यूज महाराष्ट्.*
राशी भविष्य(११ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य
