अखेर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अकरावी विज्ञान प्रवेशाचा मार्ग मोकळा; हजारो, विद्यार्थी व पालक सुखावले.

मूल : गत अनेक महिण्यांपासून 11 वी विज्ञान प्रवेशासाठी भटकंती करून थकलेल्या पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्धारे दि.10 नोव्हेंबरला परिपत्रक काढून चंद़पूर, गडचिरोली जिल्यहयातील विद्धाथी यांना 11वी विज्ञान प्रवेशाचा मार्ग सुकर करून दिला आहे.
           अध्यादेशानुसार आता ग्रामीण व शहरी क्षेत्रातील 11वी विज्ञान प्रवेश तुकडीची
विद्यार्थी संख्या 120 करण्यात आली आहे. या अगोदर ग्रामिण क्षेत्रातील माध्य.शाळांना संलग्न कनिष्ट महाविद्यालयांना प्रती तुकडी विद्यार्थी संख्या 80 मर्यादित करण्यात आल्याने ग्रामिण भागातील 11वी प्रवेश घेण्यास इच्छुकांना गत 5 महिण्यांपासून प्रवेशापासून वंचीत राहावे लागले होते. तालुक्यात फार मोजक्या ठिकाणी कनिष्ट विज्ञान महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखा असल्याने व मोठया शहरांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेउन पुढील शिक्षण घेणे
शक्य नसल्याने अधिकच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे संस्थांना शक्य नव्हते.
        प्रवेश न झाल्याने हादरलेल्या पालकांनी मोठा पाठपुरावा सुरू केला होता. माजी मंत्री शोभाई फडणवीस यांनी विद्यार्थी हित व पालकांची अडचण लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभाग सचिव, संचालक, सहसंचालकांकडे सतत पाठपुरावा केला होता.
          अखेर शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून संचालक व सहसंचालक यांना भौतीक सुविधा बघून 11वी विज्ञान प्रवेशाचे स्पष्ट आदेश काढण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
        सदर आदेश चंद्रपूर गडचिरोली जिल्हयातील पालक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणविस यांचे
आभार मानले आहेत. सत्र 2021-22 मध्ये इयत्ता10 वी चा
भरमसाठ लागलेला निकाल व विद्यार्थी यांचा विज्ञान शाखेकडे असलेला मोठा कल बघता संस्थांना हजारो विद्यार्थी यांना प्रवेश नाकारावे लागले होते.
           आता मात्र पालक सुखावले असून गत महिण्यानंतर विद्यार्थी आता 11 वी विज्ञान प्रवेश घेऊ शकतील.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

Exit mobile version