पोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या पोलीस बॉईज संघटनेचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व पदावर  सेवेत  असलेले पोलीस कर्मचारी आणि सेवानिवृत्त पोलीस कार्मचारी यांच्या न्याय आणि हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या कार्याचा राज्याचे उपमुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेऊन संघटनेच्या कामाचे कौतुक केले आहे.या संघटनेचे प्रमुख राहुल दुबाले यांच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांनी ना.फडणवीस यांची भेट घेतली या वेळी चिपळूण चे सुपुत्र कोकण प्रमुख सैफ सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.आज रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीबाबतही राहुल दुबाले ,सैफ सुर्वे यांनी ना.फडणवीस यांना माहिती दिली.     
          पोलीस बॉईज संघटचे संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलिस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल दुबाले  यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीं शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे भेट घेऊन पोलीस बांधवांच्या विविध समस्या आणि पोलिसांच्या हितकारी प्रलंबित असणाऱ्या विविध योजना या बाबत सविस्तर चर्चा केली या वेळी कोकण प्रमुख सैफ सुर्वे,  राज्य सचिव योगेश कदम,
मुंबई अधय्क्ष सिद्धांत बागुल,  मुंबई संपर्क प्रमुख सिद्धेशवर सुळे,  सल्लागार अंकुश पवार, कोर कमीटी मेंबर महेंद्रसिंह राठोड आदी उपस्तिथ होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आणि निवृत्त कार्मचारी यांच्या असणाऱ्या समस्या ,शासन दरबारी प्रलंबित असणारी प्रकरणे,नव्या पोलीस भरतीत सेवेत असतांना मयत झालेल्या पोलीस कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामाऊन घेणे अशा प्रकारच्या अनेक मागण्याचे निवेदन आम्ही उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणीस यांना दिले असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे कोकण विभाग प्रमुख चिपळूण चे सुपुत्र सैफ सुर्वे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
फोटो :  महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलिस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल दुबाले  यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीं राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलीस बांधवांच्या विविध समस्या आणि पोलिसांच्या हितकारी प्रलंबित असणाऱ्या विविध योजना या बाबत सविस्तर चर्चा केली या वेळी कोकण प्रमुख सैफ सुर्वे,
राज्य सचिव योगेश कदम,
मुंबई अधय्क्ष सिद्धांत बागुल,
मुंबई संपर्क प्रमुख सिद्धेशवर सुळे, सल्लागार अंकुश पवार,
कोर कमीटी मेंबर महेंद्रसिंह राठोड आदी उपस्तिथ होते.(छाया : ओंकार   रेळेकर)

Exit mobile version