कारवांचीवाडी भागात डांबरात अडकलेली घोरपडीला प्राणिमित्र आणि वनविभागच्या सहाय्याने जीवदान..

प्राणिमित्रांनी वन विभाग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शना खाली त्या घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडले

रत्नागिरी : रत्नागिरी वन परिक्षेत्रातील कारवांची वाडी भागातील सचिन सुहास रेवाळे (रा. आदर्श वसाहत, कारवांचिवाडी, रत्नागिरी) यांच्या घरा शेजारी शुक्रवारी ११/११/२०२२ रोजी सकाळी ०८.१५ वा. च्या सुमारास एक घोरपड डांबराच्या पडलेल्या पिंपात डांबरात अडकलेली आढळून आली. सदरच्या घोरपडीला वाचविण्यासाठी स्थानिकांनी प्राणी मित्रांना बोलावले असता प्राणी मित्रानी सर्व प्रथम वन विभागाचे श्री. गावडे यांना माहिती दिली, ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या उपस्थिती स्थानिक सचिन रेवाळे, अक्षय तोंडवलकर, प्राणी मित्र सुनील कुळये, योगेश शिंदे यांनी सदर घोरपडीला त्या डांबरातून मुक्त केले व पूर्ण स्वच्छ करून सुखरूप वन विभाग कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीला सुरक्षित असल्याची खात्रीकरून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
               सदर चे बचावकार्य श्री. प्रकाश सुतार, परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी व त्यांचे अधिनस्त न्हानू गावडे, वनपाल,  रत्नागिरी यांचे मार्गदर्शना खाली पुर्ण झाले. तरी यापुढे वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आलेस किंवा संकटात सापडलेस वन विभागाचे टोल फ्री क्रमांक १९२६ या हेल्प लाईनवर अथवा वाईल्ड लाईफ सर्व्हायवर्स, रत्नागिरी या संस्थेच्या हेल्पलाईन नंबर 9890296441 वर संपर्क साधणेचे आवाहन प्राणी मित्रांनी केले आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

Exit mobile version