चिपळूण : (ओंकार रेळेकर )मुंबई जोगेश्वरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकणी मालवणी जात्रोउत्सव कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकामंत्री जोगेश्वरी चे उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा कार्य करणाऱ्या कोकण चे सुपुत्र आदित्य थेराडे यांना विशेष सन्मानीत करण्यात आले.
जोगेश्वरी पूर्वेतील शामनगर तलाव येथे ईच्छापुर्ती मंदिरा जवळ कोकणी-मालवणी जात्रोउत्सव कार्यक्रमात आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांनी कोविड १९ महामारी च्या काळात भयंकर संकट ओढवले होते समस्त जनता अत्यन्त त्रस्त असताना जनतेला आरोग्य तसेच दैनंदिन जीवना मध्ये खरया अर्थाने मदतीचा आधाराची गरज होती अशा काळात आपल्या स्वतः चा जीवाची पर्वा न करता किंवा कुटुंबाचा विचार न करता संकटाला सामोरे जाण्यासाठी फार मोठे सेवा कार्य करण्यासाठी हे पुढे आले व विभागातील जनतेला दिलासा दिला करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अथक प्रयत्न केले; खरया अर्थाने संकट समई योद्धा म्हणुन माणुसकीचे कर्तव्य बजावल्यांचा सत्कार करण्यात आला.स्तुथ्य कार्याबद्दल जोगेश्वरी आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते श्री आदित्य अशोक थेराडे यांना गुरुवारी कोविड योद्धा म्हणुन सन्मानित करण्यात आले फोटो : आदित्य थेराडे यांना उत्कृष्ठ कोविड योद्धा म्हणून सन्मानीत करताना आमदार रवींद्र वायकर आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)
माजी पालकामंत्री आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते आदित्य थेराडे कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानीत
