भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी माजी जि. प. सदस्य बाबू पाटील यांची नियुक्ती; ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळेल यश – ॲड. दीपक पटवर्धन.

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे काम भाजप दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी हाती घेतले आहे. यातूनच जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी वाटद-खंडाळा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील यांचेवर सोपवण्यात आली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटद जिल्हापरीषद गटातील होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी देखील बाबू पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. भाजपचे दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी नुकतीच ही निवड जाहीर करताना बाबू पाटील यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, माजी नगरसेवक राजू तोडणकर, सरपंच मिलींद वैद्य, नंदू शेठ बेंद्रे माजी शिक्षण सभापती विजय सालीम आदी उपस्थित होते. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी बाबू पाटील यांच्याकडे रत्नागिरी तालुक्यातील वाटद जिल्हापरिषद गटातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपला निश्चितच चांगले यश मिळेल असा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version