पाटेकुर्रा गावा जवळ काळी पिवळी आणि ट्रक मध्ये भीषण अपघात तीन ठार.

गोंदिया : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ गोंदिया ते कोहमारा वर आज सकाळी ०९ वाजता पाटे कुर्‍हा गावाजवळ  दोन वाहनात अपघात झाला असून काळी पिवळी आणि ट्रक मध्ये हा अपघात झाला आहे.  वाहनातील तीन प्रवासी अपघात दरम्यान जागीच ठार झाल्याची माहिती आहे. त्यातच वाहनात बसलेले अन्य ६ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्तःळी महामार्ग पोलीस उपस्थित आहेत. दरम्यान घटनेचा तपास चालू आहे. पाटेकुर्रा गावाजवळ मुख्य मार्गावर हा अपघात झाला आहे. मृतक नामे : श्याम शंकर बंग ता. गोरेगाव वय वर्ष 55 असे असून या वाहनात ७ लोक सवार होते.  काली पिवळी वाहन क्र: mh ३६, ३१११ असे असून हे कोहमारा वरून गोंदिया कडे जात होते तर ट्रक क्र: mh ४० y ८४८७  गोंदिया कडून कोहमारा कडे येत  होते. दरम्यान पाटेकरा  जवळ हा अपघात झाला. जखमींना उपचाराकरिता गोंदिया येथील kts  हलविण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास डूग्गीपार आणि महामार्ग पोलीस करीत आहेत.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

Exit mobile version