डोंबिवली : मनसेच्या दीपोत्सवात ठाकरे-शिंदे- फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमानंतर मनसेने डोंबिवलीत दीपोत्सव ठेवला होता. त्याच ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांनीसुद्धा आपला कार्यक्रम ठेवला. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदेंनी पहिल्यांदाच मनसेच्या मध्यवर्ती शाखेत भेट दिली. त्यामुळे भाजप-मनसे-शिंदे गट यांची महायुती होणार का, या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

पत्रकारांनी शिंदे मनसे युती होणार का याबाबत विचारले असता श्रीकांत शिंदे यांनी उत्तर देताना म्हटले की दीपावली हा उत्सव आनंदाचा आहे आनंद वाटायचा असतो भेटीगाठी होत असतात. विरोधक सुद्धा एकाच व्यासपीठावर एकत्र येत असतील तर चांगलंच आहे. असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांना उत्तर दिले.
राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू झाल्या असून शिंदे- मनसे- भाजप महायुतीची ही नांदी तर नाही ना असे बोलले जात आहे. *दखल न्यूज महाराष्ट्र.*