आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात पंडित नेहरुंना अभिवादन..

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालदिन साजरा करण्यात आला. या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभाग व सांस्कृतिक विभागाच्यावतीने करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी पं. नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळेस प्राचार्यांनी पं.नेहरु यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. मयुरेश राणे यांनी केले. मुक्ता पंडित या विद्यार्थिनीने पं. नेहरूंच्या जीवनप्रवासाचा आढावा आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून घेतला. आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा.सीमा शेट्ये यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. धनंजय दळवी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा कोरे, प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनय पातेरे आणि प्रा. सुनील वैद्य यांची उपस्थिती लाभली. फोटो- पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील आणि शिक्षक वृंद.
छाया- प्रा. धनंजय दळवी.

🩺 जाहिरात..🩺
▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801
Exit mobile version