रत्नागिरी : कोल्हापूर उचगाव येथून सहलीसाठी रत्नागिरीत आलेल्या मुलांच्या ग्रुपमधील तेरा वर्षीय मुलगा काल दुपारी आरे-वारे समुद्रात बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात यश आले. प्रकृती खालावल्याने त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते. अत्ता त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली.
कोल्हापूर उजगाव येथील एका शाळेची सहल रत्नागिरीत आली होती. शिक्षक सहल घेऊन रत्नागिरीत आले होते. दुपारी एक वाजता सर्वजण आरे वारे समुद्रकिनारी पोचले तेथे गेल्यानंतर मुले मौज मजा करण्यासाठी आरे वारे समुद्रात उतरली होती. बराच वेळ मजा मस्ती सुरू असताना अचानक आदित्य अरुण मंचावकर (वय 13) हा मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात ओढला जाऊ लागला. त्यानंतर सोबत असलेल्या मुलासह शिक्षकांनी आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यातील काही ग्रामस्थांनी समुद्र जाऊन आदित्यला बाहेर काढले. त्यानंतर आदित्यला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य मूळचा कोल्हापूर येथे असल्याने रात्री उशिरा त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. दैव बलवत्तर म्हणून या मुलाचे प्राण वाचले.
*दखल न्यूज महाराष्ट्र*

▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801