‘लव्ह जिहादी’, ‘नराधमी’ आफताबला त्वरीत फासावर लटकवा ! – हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेची मागणी.

रत्नागिरी – जी झाशीची राणी केवळ महिलांसाठी नाही तर संपूर्ण राष्ट्रासाठी उभी राहिली ती आपणा सर्वांनाच आदर्श आहे. ‘लव्ह जिहाद’च्या रुपात हिंदु महिलांसमोर एक महाभयंकर षडयंत्र उभे आहे. नुकतीच घडलेली घटना म्हणजे श्रद्धा वालकरने लग्न करण्याविषयी आफताबकडे आग्रह धरल्यावर त्याने तिचे ३५ तुकडे करत निघृणपणे हत्या केली. ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि देशभरातील युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. या घटनेतून लव्ह-जिहादी आफताबची वासनांधता, क्रूरता आणि विकृत मानसिकता दिसून येते. ‘लव्ह जिहाद’ला आणि आफताबसारख्या नराधमांवर वचक बसविण्यासाठी राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, तसेच आफताबला फाशी देण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. नारायणी शहाणे यांनी केली. रत्नागिरी येथे मारुति मंदिर परिसरात हिंदुत्त्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेतर्फे ही मागणी करण्यात आली. या वेळी कु. नारायणी शहाणे बोलत होत्या. आंदोलनाला १२५ धर्माभिमानी हिंदु उपस्थित होते.
आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या महिला सहभागी झाल्या होत्या. या वेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक धरून ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा ! झालाच पाहीजे !’, ‘आफताबला फाशी झालीच पाहीजे !’, ‘हिंदु युवतींनो जागृत व्हा ! दुर्गा, चंडी, काली व्हा !’, अशा घोषणा दिल्या.
श्रद्धा वालकर हिच्या हत्येचे अन्वेषण करून आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी ! – डॉ.(सौ.) साधना जरळी, हिंदु जनजागृती समिती
श्रद्धाने वालकरने लग्नाचा आग्रह धरल्यामुळे आफताबने तीची हत्या केली. यातून धर्मांधांची क्रुरता, वासनांधता लक्षात येते. हिंदु मुलींना फसव्या प्रेमात अडकवणे, धर्मपरिवर्तन करणे म्हणजे ‘लव्ह जिहाद’. धर्माविषयी असलेल्या अज्ञानामुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडतात. हे थांबवण्यासाठी प्रथम श्रद्धाच्या हत्येचे अन्वेषण होऊन लवकरात लवकर आफताबला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा’ करण्यात यावा.
आपण स्वत:पासून सुरुवात करायला हवी ! – सौ. किरण देवल-अमरावत, श्री मरुधर विष्णु समाज
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून होणारे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. आपण आपल्यापासून सुरुवात करूया. आपल्या मुलांना धर्माविषयी माहीती देऊया. कायद्याच्या दृष्टीने सर्वांना सुरक्षिततेचा अधिकार आहे. तरीही अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत आणि जर अशा घटना घडत आहेत तर संघटितपणे याचा विरोध व्हायला हवा. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून भितीचे वातावरण निर्माण होत आहे. आपण याला संघटितपणे विरोध केला पाहीजे.
मातांनी दुर्गामाता होणे आवश्यक ! – सौ. उमा अनिल देवळे, जिल्हा उपाध्यक्षा, विश्व हिंदु परिषद
उठाव करण्याची हीच खरी वेळ आहे. सुरुवात आपल्या घरातील मुलांना धर्मशिक्षण देऊन करायला हवी. आपले संस्कार कुठे कमी पडतात ते पहायला हवे. करिअर महत्वाचे आहेच पण कुटुंबालाही तेवढेच महत्व द्यायला हवे. आत्तापर्यंत गेले पण यापुढे असे बळी जायला नकोत. घरातील मातांनी दुर्गामाता होणे आवश्यक आहे.
सहभागी संघटना
हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, श्री मरुधर विष्णू समाज, विश्व हिंदू परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, हिंदू राष्ट्र सेना, गोसेवा संघ रत्नागिरी, बजरंग दल, रा. स्व. संघ
अन्य उपस्थिती
सनातन संस्थेच्या सौ. शुभांगी मुळ्ये,
श्री मरुधर विष्णू समाजाच्या सौ. सीमा देवल, सौ. शोभा देवल, सौ. पुष्पा चौधरी

🩺 जाहिरात..🩺
▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801
Exit mobile version