एसीबी इंटरनॅशनल प्लेस्कूलच्या बालविद्यार्थ्यांनी फॅन्सीड्रेस स्पर्धेतून सादर केले कलागुण..

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या चिपळूण तालुक्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या एसीबी इंटरनॅशनल प्लेस्कूल स्कूल चिपळूण बाजार समोर मार्कंडी येथील शाळेत शुक्रवारी बालविद्यार्थ्यांसाठी फॅन्सीड्रेस स्पर्धेस आयोजन करण्यात आले होते.एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन सौ. सायली अमोल भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये चिमुकल्या बालविदयार्थ्यानी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. पोलीस,वकील,सैनिक, डॉक्टर,शेतकरी,पायलट यांच्या वेशभूषा बालकलाकारानी सादर केल्या प्ले ग्रुप,नर्सरी,ज्युनिअर केजी,सिनिअर केजीच्या मुलांनी फॅन्सिड्रेस स्पर्धेतून आपल्यातील कलागूण सादर केले. एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन
सौ.सायली अमोल भोजने,संचालिका सौ.पूजा खताते,कॉन्सिलर मुद्रा वाजे,आर्या चिले,शुभांगी पाटील, सानिया दळवी आदी शिक्षक वर्गाने हा कार्यक्रम यशस्वी होण्या करीता विशेष मेहनत घेतली. गेली बारा वर्ष चिपळूण मध्ये एसीबी इंटरनॅशनल स्कूल च्या माध्यमातून सी.बी.एस.ई बोर्ड पॅटर्नचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या स्कूल मध्ये
एसीबी इंटरनॅशनल स्कूल चे प्रमुख अँड.अमोल चंद्रकांत भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर मुलांना उपयोगी उपक्रम राबविले जातात तसेच वार्षिक सर्व धर्मीय सणं ,उत्सव , देशभक्तीपर कार्यक्रम येथे यशस्वी रित्या राबविले जातात . नवीन शेषणिक वर्ष २०२३- २०२४ मध्ये पालकांनी वेळेतच आपल्या पाल्याचे नाव नोंदवून शाळेत प्रवेश घ्यावा या करीता एसीबी इंटरनॅशनल स्कूल कापसाळ संपर्क : ९७६७६०८३६३
आणि स्कूल चे समन्वयक ओंकार रेळेकर ९०११३३९३९४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. फोटो : फॅन्सीड्रेस स्पर्धेत सहभागी एसीबी इंटरनॅशनल प्लेस्कूल चे बालविद्यार्थी छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

🩺 जाहिरात..🩺
▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801

Exit mobile version