रत्नागिरीची कन्या डॉ.प्रुवप्रभा पाटील United Nations Climate Change Conference 2022 मध्ये प्रतिनिधी.

रत्नागिरी : प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राधारानी पाटील यांची कन्या आणि आम आदमी पार्टी रत्नागिरीच्या जिल्हा संयोजक श्री ज्योतिप्रभा पाटील यांची बहिण, डॉ.पूर्वप्रभा पाटील यांनी या वर्षी इजिप्तमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत COP27 मधे प्रतिनिधित्व केले आहे.

डॉ.पूर्वप्रभा यांनी हवामान बदलामुळे भारतातील आरोग्यसेवेवर कसा परिणाम होत आहे यासंबंधी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत, आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माननीय संचालक डॉ. मारिया नीरा यांची परिषदेत भेट घेतली. डॉ.पूर्वप्रबा यांनी यापूर्वी संयुक्त राष्ट्र महासभा (United Nations General Assembly) आणि जागतिक आरोग्य संघटनेत प्रतिनिधी म्हणूनही बोलले आहे, आणि लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनमधून सार्वजनिक आरोग्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. आणि सध्या पोस्ट ग्रॅज्युएट वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर आहेत. त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

🩺 जाहिरात..🩺
▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801
Exit mobile version