वणवा नियंत्रणासाठी अग्निशमन हेलिकॉप्टर असायला हवे.’आप’ रत्नागिरीचे जिल्हा संयोजक श्री ज्योतीप्रभा पाटील यांचा मुख्यमंत्री आणि सर्व खासदारांना पत्र.

रत्नागिरी : दिनांक 19/11/22: रत्नागिरी – बदलत्या हवमानाचा आणि खेड तालुक्यातील वणवा समस्येचा संदर्भ देत आम आदमी पक्ष रत्नागिरीचे संयोजक श्री ज्योतीप्रभा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथ शिंदे, व लोकसभा आणि राज्य सभेच्या खासदारांसह २८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना पत्र लीहीती देश पातळीवर जंगलातील आग रोखण्यासाठी अग्निशमन हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी निधी वितरित करण्याची मागणी केली असून, या बाबत लोक सभेत चर्चा होणे आवश्यक असल्याची माहिती दिली आहे. सध्या परिस्थितीत बहुतांश भारतीय राज्यांकडे जंगलातील आग विझवण्याची क्षमता नसून, हवेतून चालणारी अग्निशामक उपकरणे  नसल्याने, ते जंगलातील आगीशी लढण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टरवर अवलंबून आहेत. श्री.पाटील यांनी सरकारला अशा प्रकारच्या वणव्याला प्रवण असलेल्या संवेदनशील भागांचा शोध घेण्यासाठी सॅटेलाईट इमेजरीचा वापर करावा आणि आगीपासून, संरक्षित वन्य क्षेत्रांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या हेलिकॉप्टर आणि ड्रोनची संख्या निश्चित करावी, असेही सुचवले आहे.
          श्री ज्योतिप्रभा यांनी वातावरणातील बदलामुळे अशा वणव्यात वाढ होत असल्याची माहिती देत ते म्हणाले की “जर आपण वणवा कमी करण्यास सक्षम आणि तयार नसलो, तर धिर्गकाळात या मुळे जीवितहानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

Exit mobile version