राजापूर : काही महिन्यापूर्वी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवारांची केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं. त्याबद्दल आज शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) लांजा तालुक्याच्यावतीने शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध व्यक्त करण्यात आला. त्याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, उप तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, दिलीपभाऊ पळसुरेदेसाई, तालुका महिला आघाडी लीलाताई घडशी, तालुका युवती अधिकारी दीपाली दळवी, विभागप्रमुख लक्ष्मण मोर्ये, उप विभागप्रमुख मंगेश जाधव, चेतन खंदारे, सिद्धेस पांचाळ, नगरपंचायत उप नगराध्यक्ष पूर्व मुळे, नगरसेवक सचिन डोंगरकर, स्वरूप गुरव, लहू कांबळे, राजू हळदणकर, समृद्धी गुरव, मधुरा बापेरकर, यामिनी जाईल, दुर्वा भाईशेट्ये, शिव सहकार सेना तालुका संघटक चंद्रकांत शिंदे, गणेश लाखन, सुरेश झोरे, परवेझ घारे, धर्मेंद्र पालये, रवी शिखरे, प्रसाद भाईशेट्ये, दीपक कटम व उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)लांजा तालुक्याच्यावतीने निषेध.
