चिपळूण : (ओंकार रेळेकर )चिपळूण शहरातील बाजारपेठ परिसरातील गटाराच्या कित्येक वर्षे रखडलेल्या कामासाठी बाळासाहेबाच्या शिवसेनेच्या गटाने मागणी करून सदरील भागात गेली कित्येक वर्षे चिपळूण शहरातील जुने बस स्थानक ते चिपळूण अर्बन बँकेपर्यंतच्या दोन्ही बाजूकडील गटार , पूजा चित्रपट गृह ते बाजार पेठ येथिल गांधी चौक पर्यंत तसेच भेंडीनाका परीसर ते खाटीक गल्ली भागातील मटण मार्केट परीसर या भागात असे बाजार पेठ येथिल अनेक ठिकाणी रखडलेल्या कामासाठी चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री.ठसाळे व श्री. साडविलकर यांचेकडे निवेदन देऊन अनेक वर्षे प्रलंबीत कामासाठी चिपळूण नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
चिपळूण शहरातील अनेक वर्षे प्रलंबीत असलेल्या सदर कामाचे निवेदन देताना बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमूख श्री. संदेशजी आयरे , युवासेनेचे नूतन तालुकाप्रमुख श्री. निहार कोवळे श्री.महमदभाई फकीर, श्री.राकेश देवळेकर ,श्री.अंकुश आवले उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.
चिपळूण शहरातील बाजारपेठ भागातील मुख्य गटाराची बाळासाहेबाच्या शिवसेनेच्या गटाने केली मागणी …
