रत्नागिरी : दिनांक २३ नोव्हेंबर रोजी राजापूर तालुक्यातील बारसु व देवाचेगोठणे येथील काही ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते तथा राजापूर -लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी घेतलेल्या प्रकल्पाबाबत भूमिकेमुळे त्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली.
त्याबाबत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी तालुक्याच्या वतीने विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे व तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी तसेच उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उप शहरप्रमुख श्रीकृष्ण चव्हाण, नितीन तळेकर व शहर महिला आघाडी मनीषा बामणे ह्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा कार्यालय, आठवडा बाजार येथे एकत्रित पणे येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक ह्यांना शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या विरोधात जे चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून त्यांची बदनामी व त्यांच्या सुरक्षेचा बाबत धोका निर्माण केल्याबद्दल निवेदन देण्यात आले. व जिल्हा पोलीस अधीक्षक ह्यांच्याशी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी असलेली सुरक्षा गृह विभागाकडून वाढवण्यासाठी चर्चा करून केली. त्यावेळी तालुका व शहरातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडी च्या पदाधिकारी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.
रत्नागिरी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर.
